तरडगाव, ता. फलटण येथील दोघांवर कोयत्याने वार झाल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फलटण : तरडगाव, ता. फलटण येथील दोघांवर कोयत्याने वार झाल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय आनंदा ननावरे वय २५, अमर धनंजय भिसे वय २३ दोघेही रा. तरडगाव, ता. फलटण यांच्यावर गावात झालेल्या भांडणांमध्ये पाच जणांनी कोयत्याने वार केल्याने त्यात ते जखमी झाले त्यांच्यावर प्रथम लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


