maharashtra

कराडवाडी गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला


The body of an unidentified woman was found in Karadwadi village
कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ एप्रिल रोजी अडीच वाजण्याच्या पूर्वी कराडवाडी गावच्या हद्दीत डोंगर उतारावर एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची खबर विश्वजीत आबाजी धायगुडे, रा. अंदोरी, ता. खंडाळा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.