maharashtra

जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत


raid on gambling dens; One and a half lakh items seized
कोरेगाव तालुक्यातील एका गावात सुरू असणार्‍या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा : कोरेगाव तालुक्यातील एका गावात सुरू असणार्‍या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत पैशांवर अवैध जुगार खेळत असणार्‍या संभाजी विष्णू पवार (वय 60), अशोक शंकर कुंभार (वय 62), गफूर बादशाह मुलाणी (वय 62), संजय रामराव थोरात (वय 48), सतीश साहेबराव गायकवाड (वय 44), कृष्णा शंकर जाधव (वय 45), प्रकाश रघुनाथ कुंभार (वय 42, सर्व राहणार आर्वी, तालुका कोरेगाव) आणि महेंद्र तात्या तूपसौंदर्य (वय 52, राहणार नागझरी, तालुका कोरेगाव) यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम व दोन दुचाकी गाड्या असा एकूण 1 लाख 42 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.