maharashtra

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास 3 वर्षे सक्तमजुरी


3 years hard labor in case of molestation of a minor girl
शाळकरी मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याप्रकरणी दत्तात्रय किसन माने (वय 47, रा. ढवळेवाडी पो.निंभोरे ता.फलटण) याला सातारा जिल्हा न्यायालयात 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता.

सातारा : शाळकरी मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याप्रकरणी दत्तात्रय किसन माने (वय 47, रा. ढवळेवाडी पो.निंभोरे ता.फलटण) याला सातारा जिल्हा न्यायालयात 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता.
ही घटना दि. 4 एप्रिल 2017 रोजी सांयकाळी घडली होती. दत्तात्रय माने याने अल्पवयीन शाळकरी मुलीला बोळात नेवून तिचा विनयभंग केला. या घटनेत मुलीने सुटका करुन घेत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानुसार पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सपोनि एस.के.शिंगटे यांनी करुन सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन विशेष जिल्हा न्यायाधिश ए.के.पटणी यांनी आरोपी दत्तात्रय माने याला 3 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 2 महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली.