maharashtra

नवीन प्रजातीच्या सुंदर पालीला दिले संशोधकाच्या वडिलांचे नाव

साताऱ्याचे वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांचा शोध

भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना ही पाल तामिळनाडू मधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांमधील घनदाट जंगलात आढळून आली.

सातारा : भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना ही पाल तामिळनाडू मधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांमधील घनदाट जंगलात आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या टीमचे दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात कित्येक वर्ष शोध मोहीम घेत होते.
साधारणपणे समुद्र सपाटीपासून 1245 मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागात असणाऱ्या घनदाट जंगलात 2013 पासून संशोधनाचे काम चालू होते, हे जंगल विविध लहान-मोठ्या हिंस्र प्राण्यांनी भरलेले आहे आणि ज्या भागात ही शोधमोहिम चालू होती, तेथे ना प्यायच्या पाण्याची, जेवायची सोय, ना रहायची सोय. इतकेच नव्हेतर येथे मोबाईलला सुध्दा कसलेच नेटवर्क नव्हते. पाऊस आला की झाडाखाली थांबत, भुक लागल्यावर जे बरोबर जेवणाचे सामान नेले आहे त्यावर गुजराण करत, त्याच बरोबर वाघ, अस्वल, आणि जंगली हत्ती सारख्या प्राण्यांच्या अधिवासात काम करावे लागत होते.
2015 ला अमित च्या परिश्रमाला आखिर यश आले आणि ही पाल सापडली. नंतर या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून तिच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा व जनुकीय अभ्यास अमित ने सुरू केला. शास्त्रीय अभ्यासातून नक्की झाले की ही पाल नवीन असुन वण्यजीव शास्त्रात याची आजुन नोंदच नाही.
अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे ठरवले. प्रो. रशीद सैय्यद हे अमित चे वडील आसूंन "निमाम्स्पिस रशिदी" असे या पालीचे नाव ठेवण्यात आले. आज या पालीच्या संशोधन पत्रिका "एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी" या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिके प्रसिद्ध झाली, "निमास्पिस रशिदी" ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढर्या आणि काळ्या रंगाच्या रंग छटामुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते.
या संशोधनामध्ये अमित सैय्यद, सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, आयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.