maharashtra

4 घरफोडी व 2 चोरीच्या गुन्ह्यातील 4 सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई; सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कारवाई करीत चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या सराईत गुन्हेगारांकडून सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 घरफोडी व 2 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

सातारा : स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कारवाई करीत चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या सराईत गुन्हेगारांकडून सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 घरफोडी व 2 चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे.
दिनांक 25 मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार दहीवडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करण्याकरीता पेट्रोलींग करीत असताना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दहिवडी बाजूकडून सातारा बाजूकडे अशोक लेलंड टेम्पो क्र. एम.एच.11 डी.डी.2334 व मारुती अल्टो कार क्र. एम.एच.04 डि.जे. 4115 मधून चोरीचा माल घेवून काही लोक येत आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोउनि पाटील व पोलीस अंमलदार यांनी पिंगळी फाटा ता.माण जि.सातारा येथे सापळा लावून बातमीतील वाहने पकडून वाहनातील पोलीस अभिलेखावरील आरोपी अमर बापूसाहेब देवगुडे वय 26 वर्षे रा. खोकडवाडी ता. जि. सातारा, संतोष शामराव सोनटक्के वय 25 वर्षे रा. भांडवली ता.माण जि.सातारा अशी असल्याचे व अल्टो कार मधील इसमांनी त्यांची नांवे विनोद निवृत्ती खरात वय 25 वर्षे रा. श्रीनगर नवीन एम. आय. डी. सी. सातारा मुळ रा. भालवडी ता.माण जि. सातारा आणि शशांक दिपक जाधव वय 21 वर्षे रा. खोकडवाडी ता. जि. सातारा यांच्या ताब्यातून जनरेटर, फ्रिज, संगणक, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मुर्त्या, एल.सी.डी. टीव्ही, पिठाची चक्की, सिलेंडर, उसाचे गुराळ, मोपेड मोटार सायकल, टेम्पो व अल्टो कार असा एकुण 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन रहिमतपूर पोलीस ठाणे गुरनं 6 / 2023 भादंवि कलम 380, 457, औंध पोलीस ठाणे गुरनं 215/2022 भादंवि कलम 454, 457,380 दहिवडी पोलीस ठाणे गु.र.नं. 249/2023 भादविक 454, 457, 380 सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.274/2022 भादविक 454, 457, 380, पुसेगांव पोलीस ठाणे गुरनं 68 / 2023 भादंवि कलम 379, चिपळूण पोलीस ठाणे जि.रत्नागिरी गुरनं 73 / 2023 भादंवि कलम 379 असे एकुण 4 घरफोडीचे व 2 चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउनि अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.