maharashtra

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वेळे, तालुका वाई गावच्या हद्दीत हॉटेल अथर्व समोर सर्विस रस्त्याला जोडणारा डिव्हायडर तोडून त्यामध्ये मुरूम टाकून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शेखर ताटे राहणार वेळे, तालुका वाई यांच्यावर रत्नकांत बबन पोळ वय 51 यांनी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. व्ही. आवळे करीत आहेत.