अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पाटखळ माथा तालुका सातारा येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी ऑफिसच्या समोर असणाऱ्या रस्त्यावरून राजेंद्र मानसिंग कदम वय 47, रा. पाटखळ माथा, तालुका सातारा यांचा मुलगा विश्वजीत राजेंद्र कदम हा पायी चालत घरी येत असताना त्यास भरधाव वेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत नंबर प्लेट नसलेल्या हिरो कंपनीच्या दुचाकीवरून येत सुरज कृष्णा सोनवणे रा. लिंब, ता. सातारा याने पाठीमागून येऊन धडक दिली. या अपघातात विश्वजीत कदम याच्या डोक्यास दुखापत झाली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.


