maharashtra

बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात

पती-पत्नी जागीच ठार

Terrible accident on Baramati-Patas road
गुरुवार (दि.१८) रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी गाडी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले.

बारामती : बारामती - पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या आपघातात दुचाकीवरील पती - पत्नी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली. या आपघातात काळूराम गणपत लोंढे ( वय ६०) शाकूबाई काळूराम लोंढे (वय ५५ ) रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती दुर्दैवी मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवार (दि.१८) रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी गाडी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले.
ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर तालुका पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. पुढील तपास बारामती तालुका पोलीसचे सहाय्यक फौजदार योगेश लंगुटे करत आहेत.