maharashtra

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा


Crime against three women for obstructing government work
वाई ते पाचगणी जाणाऱ्या मार्गावर पोलीस हवालदार कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : वाई ते पाचगणी जाणाऱ्या मार्गावर पोलीस हवालदार कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सिद्धनाथवाडी, सायली हॉटेल जवळ, वाई, ता. वाई   येथील किसनवीर कॉलेज जवळ, वाई ते पाचगणी जाणाऱ्या मार्गावर  महिला पोलीस हवालदार क्षमा दादासाहेब माने, वय ४५, रा. वाई व त्यांचे सहकारी
पोलीस कॉन्स्टेबल कदम कर्तव्य बजावत असताना मथुराबाई राजाराम काळे, रमाबाई बाळकृष्ण काळे, दोन्ही रा. सिद्धनाथवाडी, शुभांगी जगदीश सुतार (पत्ता माहीत नाही) यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की केली. त्यातील शुभांगी सुतार हिने शासकीय गणवेशाची कॉलर पकडून मी आत्महत्या करून सर्वांची नावे चिठ्ठीत लिहून तुम्हा सर्वांना कामाला लावेन अशी धमकी दिल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.