maharashtra

मोटर सायकल चोरटा बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

5 लाख 14 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटर सायकली जप्त

एका मोटरसायकल चोरट्यास जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले असून या चोरट्याकडून 5 लाख 14 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सातारा : एका मोटरसायकल चोरट्यास जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले असून या चोरट्याकडून 5 लाख 14 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वा चे सुमारास नांदगाव, ता. जि. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलीस ठाणे डिबी पथकाचे पोलीस नाईक स्वामी, पो. ना. निकम, पो ना शिखरे पायी पेट्रोलींग करीत असताना कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्‍चिम बाजुस पुलाच्या कठड्यावर एक इसम समोरच मोटर सायकल उभी करुन बसलेला होता.
पोलीस त्याच्या समोरुन जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो लगवगीने मोटर सायकल सोडुन नदीकाठी पळुन जात असताना त्यास पो.ना शिखरे यांनी जागीच पकडले व त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यात असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच ११-डि ई ७६५८ हि सुमारे अडिच महिन्यापूर्वी कोपर्डे ता जि सातारा येथुन सकाळी ०६.०० वा चे सुमारास चोरुन नेहली असुन ती तो वापरत असल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी सदर व्यक्तिचा बोरगाव पोलीस ठाणे गुरनं ३०४/२०२२ भा.द.वि कलम ३७९ या गुन्हयात सहभाग असल्याणे सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली व त्याच्या ताब्यात मिळालेली मोटर सायकल जप्त केली.
आज रोजी या आरोपीस सपोनि रविंद्र गजानन तेलतुंबडे व पोलीस नाईक स्वामी यांनी अधिक विश्वासात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने व त्याचा मित्र आकाश प्रकाश चव्हाण रा जुना बुधगावरोड वाल्मिकी वसाहत असे दोघांनी ४ महिन्यापूर्वी वेगवेगळ्या
ठिकाणाहुन चोरलेल्या मोटर सायकली विक्री करण्याकरीता एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत, असे सांगुन ६ मोटर सायकली तारगाव ता कोरेगाव जि सातारा गावचे हद्दीतून नदी काठालगत असलेल्या नदीपुल नावचे शिवारातुन झाडा झुडपातुन सुमारे5 लाख 14 हजार रुपये किंमतीच्या 7 मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मोटर सायकली सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतुन-१, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून - १, व सांगली बाजारपेठेतुन - ५ अशा मोटर सायकली आणलेल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विमाग सातारा गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे, पो.ना स्वामी, पोहवा सावंत, पो.ना निकम, पोना शिखरे, पोकॉ मोरे यांनी केली आहे.