maharashtra

गोडोली येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण


One was beaten up in front of the toll booth at Godoli
गोडोली, ता. सातारा येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली याबाबत संबंधित दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : गोडोली, ता. सातारा येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली याबाबत संबंधित दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ डिसेंबर रोजी १० वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील जकात नाक्यासमोर अजय पार्टे, शुभम नितीन मोरे दोघेही रा. गोडोली, ता. सातारा यांनी आपापसात संगणमत करून पूर्ववैमनस्यातून अमीर दस्तगीर शिकलगार, वय २४, रा. गोडोली याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी आमिर शिकलगार याचा भाऊ जाकीर शिकलगार हा भांडणे सोडवण्यासाठी आले असता झालेल्या गोंधळात त्याचा मोबाइल पडून गहाळ झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.