आरळे, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी आठ अनोळखी इसमांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : आरळे, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी आठ अनोळखी इसमांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ एप्रिल रोजी एक वाजण्याच्या सुमारास आरळे येथे नितीन मच्छिंद्र भोसले, रा. मदनवाडी, बिगवन, ता. इंदापूर याला ८ अनोळखी इसमांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


