मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केलेल्या कामाचे वारंवार पैसे मागितल्याच्या कारणातून व्यंकट बाबर (रा. गवडी ता.सातारा) याने सचिन सुरेश देशमुख याला मारहाण केली. त्याचवेळेस सचिनची आई सुशीला सुरेश देशमुख (वय 60, रा.गवडी) यांनाही त्याने मारहाण केल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना दि. 15 नोव्हेबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


