येथील कुंभारवाडा परिसरात गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता सौ. चौगुले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
सातारा : येथील कुंभारवाडा परिसरात गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता सौ. चौगुले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या एक महिन्यापासून कुंभारवाडा परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. ज्या टाकीतून पाणी सोडले जाते तो व्हाल्व पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे टाकीतून बरेच पाणी वाहून जात असल्यामुळे कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ही घटना वारंवार होत असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तात्काळ संबंधित ठिकाणी नवीन व्हाल्व बसून सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी सौ. चौगुले यांनी आपल्या मागणीची तात्काळ दखल घेतली जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी आबा देगावकर, गणेश कुंभार, दत्ता कुंभार, मनोहर कुंभार, संभाजी कुंभार, शरद देगावकर, अजय कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.


