maharashtra

निष्काळजीपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा


निष्काळजीपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : निष्काळजीपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारस दत्तात्रय पवार वय 27, रा. साखरवाडी ता. फलटण हा दि. 17 डिसेंबर रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेम एजन्सी ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच 11 सीएफ 3709 वेडीवाकडी, बेदरकारपणे, मानवी जीविका धोका निर्माण होईल अशी चालवत असताना आढळून आला. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक ढाणे करीत आहेत.