maharashtra

गोडोलीत मोबाईल स्नॅचिंग


गोडोलीत अज्ञात चोरट्यांनी एका युवतीचा मोबाईल स्नॅचिंग करुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : गोडोलीत अज्ञात चोरट्यांनी एका युवतीचा मोबाईल स्नॅचिंग करुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 सप्टेंबर रोजी रिया रवींद्र घाडगे ही युवती तिच्या मैत्रिणी सोबत गोडोली येथून पायी जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी बजाज कंपनीच्या पल्सर मोटरसायकल वरून येऊन तिचा अठरा हजार रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने खेचून चोरून नेला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.