maharashtra

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून प्रीती सुरज महाडिक वय 24, रा. महाडिक कॉलनी, कारंडवाडी ता. सातारा यांना व त्यांच्या आईला प्रीती महाडिक यांचे पती सुरज सुधाकर महाडिक याने बॅगेतील सुरी काढून तुम्हाला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेजारी राहणारे सुशांत गायकवाड, परम भोसले आणि प्रसाद भोसले हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यावर सुरीने वार करून त्यांना जखमी केले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.