अज्ञातांनी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : अज्ञातांनी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहराजवळ महामार्गालगत अनोळखी 8 ते 10 जणांच्या टोळक्याने दोघांना क्रेनचा ड्रायव्हर कुठे आहे? असे म्हणत मारहाण केली. याप्रकरणी यश प्रमोद चतुर (वय 22, रा. खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 नोव्हेबर रोजी घडली आहे. तक्रारदार युवकासह त्याच्या मित्रालाही संशयितांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


