maharashtra

जबरी चोरी प्रकरणातील 8 जणांवर मोक्कान्वये कारवाई


Mokkanwaye action against 8 persons in robbery case
यातील दोघे खंडाळा येथील कंपनीत कामाला होते. मटका, जुगाराचे व्यसन लागल्याने त्यांनी उधारी केली होती. उसने पैसे घेतलेले लोक वारंवार पैसे मागत असल्याने ते पैसे फेडण्यासाठी संशयितांनी पुणे येथील गुंडांना सुपारी देवून पैसे लुटण्याची आयडीया दिली. संबंधित कंपनीद्वारे रोख पैसे कामगारांना दिले जात असल्याने त्या पैशावरच दरोडा टाकण्याचा कट शिजवला.

फलटण : तरडगाव, ता.फलटण येथे कार चालकाला थांबवून त्यांच्याकडील 5 लाख 34 हजार रुपयांची रोकड, मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरणार्‍या टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुणे जिल्ह्यातील टोळीला दणका दिला असून 8 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, राजू जाधव (रा.माणगाव, हिंजवडी, पुणे) या टोळीचा म्होरक्या आहे.
राजू जाधव, प्रमोद उर्फ बारक्या पारसे, रोहन भालके, शिवा राठोड, पवन ओव्हाळ, विशाल शिरवले, दत्तात्रय शिरवले, कृष्णा चव्हाण (सर्व रा. हिंजवडी, पुणे) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व संशयित अटकेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील दोघे खंडाळा येथील कंपनीत कामाला होते. मटका, जुगाराचे व्यसन लागल्याने त्यांनी उधारी केली होती. उसने पैसे घेतलेले लोक वारंवार पैसे मागत असल्याने ते पैसे फेडण्यासाठी संशयितांनी पुणे येथील गुंडांना सुपारी देवून पैसे लुटण्याची आयडीया दिली. संबंधित कंपनीद्वारे रोख पैसे कामगारांना दिले जात असल्याने त्या पैशावरच दरोडा टाकण्याचा कट शिजवला. त्यानुसार दि. 9 सप्टेबर 2021 रोजी संबंधित टोळीने कार अडवून रोख साडेपाच लाख रुपयांवर दरोडा टाकला.
पुणे पोलिसांनी एका गुन्ह्यात कारवाई केल्यानंतर लोणंद पोलिस ठाण्यातील दरोड्याचा गुन्हा ओपन झाला. त्यानंतर पुढील कारवाई लोणंद पोलिसांनी इतर संशयितांना अटक केली. गेल्या महिन्यात घडलेल्या घटनेत पोलिसांनी दरोड्यातील बहुतांशी रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर संबंधित टोळीवर पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांचा मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार केला.
मोक्काचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अजयुमार बन्सल यांनी आयजी कार्यालयाकडून त्याला मंजुरी मिळवली व पुणे जिल्ह्यातील टोळीला मोक्का ठोकला.