ऊसतोड कामगार देतो, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : ऊसतोड कामगार देतो, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2020-21 च्या ऊस गायब हंगामासाठी ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून विनोद नागोराव राठोड रा. ब्राह्मणवाडा (तांडा) ता. औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली याने युवराज नेताजी कदम रा. चंचळी, ता. कोरेगाव यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण 8 लाख 29 हजार 12 रुपये इतकी रक्कम घेऊन ऊस तोडणी मजूर न पुरवता तसेच त्यापोटी घेतलेले पैसे परतही न करता युवराज कदम यांचा विश्वासघात करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी राठोड याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.


