maharashtra

राजाळे येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू


Woman dies of electric shock at Rajale
राजाळे, ता. फलटण येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : राजाळे, ता. फलटण येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१२ जुलै रोजी ६ वाजण्याच्या सुमारास राजाळे येथे तेथीलच रुक्मिणी उत्तम दौदे ही महिला नळाला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे इलेक्ट्रिक मोटर जोडून पाणी भरत असताना त्यांना विजेचा शॉक लागून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर त्यांचा चुलत पुतण्या सुरज शरद दौदे याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.