maharashtra

साताऱ्याच्या स्नेहांजली ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड


Snehanjali Nanavare of Satara selected as Sub Lieutenant in the Indian Navy
सातार येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड  झाली आहे. प्रशिक्षणासाठी त्या एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये जाणार आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्यदलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले.

सातारा : सातार येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड  झाली आहे. प्रशिक्षणासाठी त्या एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये जाणार आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्यदलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले.
आई- वडिलाचा गृह उद्योग आहे. आई- वडिलही कराटे चॅम्पियन असलेल्यामुळे स्नेहांजली यांनाही खेळाची आवड निर्माण झाली. स्नेहांजलीने ‘धनुर्विद्या’ या खेळात राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदके मिळवली. अभ्यासातही तितकेच लक्ष घातले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेळेचे नियोजन, खेळ, व्यायाम आणि अभ्यास याचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मेहनत घेतली. मेहनत आणि चिकाटीमुळे त्यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट या प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवड झाली.
त्यांच्या या यशात वडील राजेंद्र, आई आरती, बहीण राष्ट्रीय खेळाडू ओमश्री यांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रवासात अनेक शिक्षक, मार्गदर्शकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.