maharashtra

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू


पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास करण भगवान गायकवाड वय 13, रा. निमसोड ता. खटाव हा अल्पवयीन मुलगा जनावरे धुण्यासाठी गोठ्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. त्याला पोहोता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची खबर गणेश भगवान गायकवाड यांनी वडूज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पो. हवा. कारंडे करीत आहेत.