maharashtra

चंचळी येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू


चंचळी, ता. कोरेगाव येथे विजेचा शॉक लागून एका पंधरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : चंचळी, ता. कोरेगाव येथे विजेचा शॉक लागून एका पंधरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास मृणाल संपत काटवटे (वय १५) रा. चंचळी, ता. कोरेगाव हा गावातील एका व्यक्तीच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची मोटर जोडत असताना त्याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खबर गणेश पांडुरंग काटवटे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.