maharashtra

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा


Crime against truck driver for causing death of one
दुचाकीला ट्रकने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दुचाकीला ट्रकने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 जुलै रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अतुल सूर्यकांत ननावरे वय 31 राहणार पाटखळ माथा, तालुका सातारा हे मोटर सायकल वरून क्रमांक एम एच 11 बीजे 1982 जात असताना सातारा म्हणून मार्गावरील वाडेगावच्या हद्दीत वाढे फुलाच्या पुढे ट्रक चालक नितीन जयसिंग अनभुले राहणार अनभुलेवाडी शेंदुरजणे, तालुका कोरेगाव याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच ५०- २०२५  हयगयीने, भरधाव वेगात चालवून किरण ननावरे यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये किरण बाबुराव ननावरे वय 21, राहणार पाटखळ  माथा, तालुका सातारा यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि चौधरी करीत आहेत.