मालगाव येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : मालगाव येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अजित तात्याबा कदम रा. मालगाव ता. सातारा यांच्या राहत्या घरासमोर पार्क केलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच 11 बीई 6928 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार डोंबाळे करीत आहेत.


