maharashtra

गुरुवार परजावरील जुगार अड्ड्यावर छापा


सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परजावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली आहे.

सातारा : सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परजावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठ येथील गुरुवार परज परीसरातील एका टपरीच्या आडोशाला विशाल श्रीधर सुपेकर रा. गुरुवार पेठ सातारा, प्रमोद दीपक कदम रा. चाहूर खेड ता. सातारा, संतोष शिवाजी जाधव रा. बुधवार पेठ सातारा, दत्तात्रय चिंतामणी नारकर रा. मंगळवार पेठ सातारा, मंगेश नारायण राऊत रा. बुधवार पेठ सातारा आणि दिलावर मोहीद्दिन शेख राहणार गुरुवार पेठ सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 26 हजार 780 रुपये रोख मोबाईल आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गावित करीत आहेत.