maharashtra

मंगळवार पेठेत एकावर कोयत्याने वार


मंगळवार पेठेत एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मंगळवार पेठेत एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गणेश लहू भोंडे राहणार मंगळवार पेठ सातारा हा त्याचा चुलत भाऊ नितीन बाळू भोंडे वै पस्तीस याच्या घरात येऊन पैसे मागू लागला नितीन बोंडे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हटल्याच्या कारणावरून गणेश भोंडे यांनी नितीन यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.