maharashtra

महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी एकास एक वर्षाची शिक्षा


महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी निलेश आबा बोबाटे (वय 35, रा. मल्हार पेठ, सातारा) याला 3 रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. साळवे यांनी 1 वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मधील ही घटना असून तात्काळ सुनावणी झाल्याने त्याबद्दल स्वागत होत आहे.

सातारा : महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी निलेश आबा बोबाटे (वय 35, रा. मल्हार पेठ, सातारा) याला 3 रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. साळवे यांनी 1 वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मधील ही घटना असून तात्काळ सुनावणी झाल्याने त्याबद्दल स्वागत होत आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस हवालदार आर.व्ही.दळवी यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बचाव व सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद झाला असता सरकार पक्षाचे अ‍ॅड. एम.जे.यादव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणून कॉन्स्टेबल वैभव पवार आणि महिला कॉन्स्टेबल जायकर यांनी काम पाहिले.