maharashtra

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनेत चौघांवर गुन्हा


सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनेत चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनेत चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ सप्टेंबर रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास खिंडवाडी, ता. सातारा येथे तेथीलच संतोष बबन जाधव याने पत्नी आरती संतोष जाधव ३० हिच्या सोबत भांडणे काढून तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्या डोक्यात लोखंडी पाना मारल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. ४ सप्टेंबर रोजी १ ते १.४५ वाजण्याच्या सुमारास दरे तर्फ परळी, ता. सातारा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून लक्ष्मण शिवाजी जाधव, शिवाजी जाधव, पाणबुडे, योगेश शिवाजी जाधव यांनी विकास नारायण जाधव याला जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.