लोणंद, ता. खंडाळा येथून ७४ हजार रुपयांच्या मंगळसूत्राची अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरी केली असल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा ; लोणंद, ता. खंडाळा येथून ७४ हजार रुपयांच्या मंगळसूत्राची अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरी केली असल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणंद गावच्या हद्दीत कुमार गॅस एजन्सी च्या समोरील रस्त्यावर ज्योती दत्तात्रय पांढरमिसे, वय ३८, रा. मटेटेवाडी, ता. माळशिरस या महिलेने घातलेले सुमारे ७४ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


