maharashtra

जबरी चोरी प्रकरणी दोन युवक अटकेत

1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई

Two youths arrested in robbery case
जबरी चोरी प्रकरणी दोन संशयीतांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून या चोरटयांकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे.

सातारा : जबरी चोरी प्रकरणी दोन संशयीतांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून या चोरटयांकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे.
शुभम शरद साळुंखे, (वय 29, रा.अंबवडे), साहिल संजय आवळे (वय 19, रा. पाडळी, सातारा रोड, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. दरम्यान अन्य एका विधीसंघर्षीत बालकास देखील ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोटारसायकलवरून येवून रोडने फोनवर बोलत जाणार्‍या लोकांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार साताऱ्यात घडत होते. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. दिनांक 9 जुलै रोजी गुन्ह्यातील चोरटयांची कौशल्यपूर्ण रितीने  माहिती निष्पन्न करून तसेच त्यांच्या ठावठिकाण्याची तांत्रिक माहिती प्राप्त करून शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सातारारोड, आंबवडे, पाडळी, कोरेगाव अशा ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतले. हे चोरटे केलेल्या गुन्ह्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देते होते. परंतू डी.बी. पथकातील पोलीस स्टाफने त्यांच्याकडे कौश्यल्यपूर्व विचारपूस करून त्यांच्याकडून जबरी चोरी केलेले एकूण ११ मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकूण 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय सावळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी केलेली आहे.