maharashtra

घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा


घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मार्च रोजी डीजी कॉलेज ते अंबिका हॉटेल जाणाऱ्या रस्त्यावर धनराज योगेश खरात, निखिल प्रदीप कांबळे (दोघे रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा) आणि साहिल प्रकाश बोभाटे रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव हे तिघेजण एक्सेस या दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरताना आढळून आले. त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये एक धारदार पाती असलेला सुरा मिळाल्याने या तिघांवर शस्त्र अधिनियमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.