maharashtra

जाचहाट प्रकरणी चौघांवर गुन्हा


वडीलांना धनादेशाद्वारे दिलेले २ लाख रुपये, सोन्या, चांदीचे दागिणे, मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य परत न दिल्याप्रकरणी तसेच चारित्र्याावर संशय घेवून जाचहाट, विनयभंग केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सातारा : वडीलांना धनादेशाद्वारे दिलेले २ लाख रुपये, सोन्या, चांदीचे दागिणे, मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य परत न दिल्याप्रकरणी तसेच चारित्र्याावर संशय घेवून जाचहाट, विनयभंग केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धनश्री संतोष शितोळे (वय २७, रा. कोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, याप्रकरणी पती संतोष उत्तम शितोळे, सासू कमल उत्तम शितोळे, दीर समाधान उत्तम शितोळे, जावू भाग्यश्री समाधान शितोळे (सर्व रा. कमल सदन, सोमनाथ कॉलनी, अमरलक्ष्मी स्टॉप, कोडोली, ता. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २०१६ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली. पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.