maharashtra

झोपेत वृध्दाची सोन्याची चैन लांबविली


मालदेव वाडी तालुका वाई येथील एका इसमाची झोपेत असताना अज्ञाताने 44 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे.

सातारा : मालदेव वाडी तालुका वाई येथील एका इसमाची झोपेत असताना अज्ञाताने 44 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत घडली. याप्रकरणी सुरेश राजाराम घाटे राहणार मालदेव वाडी, भुईंज, तालुका वाई यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. फिर्यादीच्या सांगण्यानुसार फिर्यादी राहत्या घरात झोपलेले असताना गळ्यामध्ये पिवळ्या रंगाची दोन तोळ्याची 44 हजार रुपये किमतीची चेन आणि त्याच्यामध्ये बदाम अशी अज्ञाताने चोरून नेली. त्याबाबत फिर्यादीने चौकशी केली असता घरात शेजारी राहणारे नम्रता सोमनाथ तोंडशीळ, निकिता लांडगे, दीपक मोरे असे त्या दिवशी फिर्यादीच्या घरी येऊन गेले होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अद्यापही कोणाला अटक झालेली नाही. पोलीस हवालदार जी. बी. गूळकर अधिक तपास करत आहेत.