maharashtra

नाणेगाव येथे वयोवृद्ध महिलेला गंडा

उपचाराची बतावणी करून कानातील कर्णफुले लांबवली

Ganda to an elderly woman at Nanegaon
नाणेगाव, ता. कराड तेथे एका वृद्ध महिलेला हाडांच्या विकारांवर दैविक उपचार करतो, अशी बतावणी करून एका अज्ञात चोरट्याने तिच्या कानातील कर्णफुले लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याला पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सातारा : नाणेगाव, ता. कराड तेथे एका वृद्ध महिलेला हाडांच्या विकारांवर दैविक उपचार करतो, अशी बतावणी करून एका अज्ञात चोरट्याने तिच्या कानातील कर्णफुले लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याला पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाणेगाव येथील हिराबाई जगन्नाथ पाटील वय 65 यांच्या घरात एक अज्ञात चोरटा घुसला. त्याने मी हाडांच्या विकारावर जैविक उपचार करतो असे सांगून त्यांच्या कानातील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर त्या महिलेला पाटण-पंढरपूर मार्गापर्यंत घेऊन जात तेथून त्याने पलायन केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून संबंधित चोरट्याला पकडण्याचे पोलीसापुढे आव्हान निर्माण झाले आहे.