वॉशरूममध्ये पडून जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
खंडाळा : वॉशरूममध्ये पडून जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
नुकतीच याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश साह, वय २८, रा. शिरवळ, ता. खंडाळा हे वॉशरूममध्ये पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकारी श्रीहरी हकनोर यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली.


