maharashtra

संत नामदेव सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिवनाथ मुळे (गुरूजी)

सलग सहाव्यांदा निवड होण्याचा बहुमान; सभासदांच्या विश्‍वासास ठरले पात्र

Shivnath Mule (Guruji) as Chairman of Sant Namdev Sahakari Patsanstha
सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा च्या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवनाथ जगन्नाथ मुळे यांच्या पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे शिवनाथ मुळे हे या पतसंस्थेचे बिनविरोध सहाव्यांदा चेअरमन ठरले आहेत.

सातारा : सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा च्या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवनाथ जगन्नाथ मुळे यांच्या पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे शिवनाथ मुळे हे या पतसंस्थेचे बिनविरोध सहाव्यांदा चेअरमन ठरले आहेत.
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवनाथ मुळे यांच्या पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे शिवनाथ जगन्नाथ मुळे यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली आहे.
केवळ आपल्या समाजापुरता विचार न करता सर्वसामान्यांसाठी अविरत झटणारी पतसंस्था म्हणून जनसामान्यांमध्ये सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्थेचा उल्लेख होतो. पारदर्शी कारभार, उत्कृष्ठ संगठण कौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि सभासद-ठेवीदारांमध्ये असलेला अतुल्य विश्‍वास त्यामुळे शिवनाथ मुळे यांची वाटचाल समाजात नेहमीच आदर्शवत राहिली आहे. शिवनाथ मुळे हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये सलग 30 वर्षे सभासदांना लाभांश देत आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान असून केशवराज ट्रस्ट पंढरपूर (संत नामदेव मंदिर) मध्ये विश्वस्त, नामदेव समाजोन्नती परिषदेचे व राष्ट्रीय ज.इ.उ. महासंघ महाराष्ट्र राज्य खजिनदार तसेच जीवनातील मुख्यकाळात ते प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या पदावर काम करत आहेत. त्यामुळेच सातारा जिल्हा संत नामदेव पतसंस्थेच्या निवडणुकीत सलग 30 वर्षे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या सलग सहाव्यांदा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीद्वारे शिवनाथ मुळे, गुरूजी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
बिनविरोध संचालकपदी निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - शिवनाथ मुळे - पुसेसावळी, सोपान काकडे - मोरगिरी, चंद्रकांत शेळके - सातारा, धनंजय बारटक्के - सातारा, कमलाकर कालेकर - कोरेगाव, धनंजय खटावकर - मेढा, चंद्रकांत खटावकर - रहिमतपूर, सचिन औंधकर - कराड, उमेश बगाडे - महाबळेश्वर, अश्विनी गाडेकर - सातारा, देवकी बारटक्के - सातारा.