maharashtra

छत्रपती शिवाजी संग्रहालयाची इमारत माघारी देण्याची मागणी

पुरातत्व विभागाचे जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र

Demand for return of Chhatrapati Shivaji Museum building
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे.

सातारा : राजधानी साताऱ्यातील ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, ती इमारत कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो हॉस्पिटल म्हणून उपयोगात आणली गेली. सध्या कोरोनाचा जिल्ह्यातील कहर कमी झाला असून स्थिती पूर्ववत झाली आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत जम्बोमध्येच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतला गेला होता. मूळ मालक असलेल्या पुरातत्व विभागाला कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. जम्बो हॉस्पिटलसाठी सध्या वापरात असलेली इमारत पुरातत्व विभागाकडे हस्तांतरण करण्यात यावी, अशी मागणी पुरातत्व विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्याचे स्मरणपत्रही पाठवले आहे. या स्मरणपत्रावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तब्बल 248 खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाची इमारत अधिग्रहित केली होती. या अधिग्रहणाला आता पंधरा महिने उलटले तरी अद्यापही जंबो चे कामकाज याच इमारतीतून सुरू आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे. या दालनासह या वस्तूंच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न झाला आहे, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक  एस. एस. शिंदे यांनी दिली.