येथील कूपर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक व महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळातील निवृत्त अभियंता किसन हणमंत शिर्के (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिर्के यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सातारा : येथील कूपर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक व महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळातील निवृत्त अभियंता किसन हणमंत शिर्के (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिर्के यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अभियंता म्हणून कार्यरत असताना किसन शिर्के यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी महावितरणमध्ये सेवा बजावली. मनमिळावू व शिस्तबध्द अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. सेवाकालात त्यांनी हजारो माणसे जोडली. एक चांगला अधिकारी व मित्र म्हणून त्यांची अोळख होती. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
त्यांच्यावर त्यांच्या गोडसेवाडी, ता. कोरेगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, भाजप नेते भरतनाना पाटील, सारंग पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व जिल्हाभरातून आलेल्या मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून बुधवार, दि. 23 रोजी सकाळी १० वा. त्यांचा सावडवण्याचा विधी गोडसेवाडी येथे होणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.


