maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा


Crime on car driver injured in accident
अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१० जून रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पोवई नाका येथील हेम मोटर्स शोरूम समोरील मार्गावर अंजुमारा जावेद इनामदार, वय ३०, रा.मल्हार पेठ, सातारा हे आपली दुचाकी क्रमांक एम.एच ११ सीएम ७८८७ वरून राहत्या घरापासून जुना आरटीओ चौक येथे जात असताना कार क्रमांक एम.एच.४६ बीव्ही ४३४३ वरील  अज्ञात चालकाने कार अविचाराने चालून दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वारास जखमी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.