maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा


Crime against an unidentified four-wheeler driver for causing death
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ एप्रिल रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास जकातवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत कुरणेश्वर मंदिरासमोर अज्ञात अल्टो चारचाकी वाहनावरील चालकाने हेमंत हणमंत नावडकर व त्यांची पत्नी स्नेहलता नावडकर दोघेही रा. सोनगाव, ता. सातारा हे दुचाकीवरून सातारा येथून सोनगाव येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने धडक देऊन हेमंत नावडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तसेच स्नेहलता नावडकर यांना या अपघातात गंभीर जखमी करून त्यांना कोणतीही मदत न करता पळून गेल्याची तक्रार विक्रम अरुण धोडंवड रा. सोनगाव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.