maharashtra

राज्यात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण : साताऱ्याचा पारा 38 अंशांवर

चंद्रपूर जगात तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर; देशात विदर्भ ठरला सर्वाधिक उष्ण

Citizens harassed by heat wave in the state: Satara mercury at 38 degrees
गत दोन दिवसांपासून राज्यभरात उष्णतेची लाट आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण असून देशात विदर्भ सर्वाधिक उष्ण ठरला आहे.  विदर्भात सूर्य तपळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर (43.4 अंश) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले.

सातारा : गत दोन दिवसांपासून राज्यभरात उष्णतेची लाट आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण असून देशात विदर्भ सर्वाधिक उष्ण ठरला आहे.  विदर्भात सूर्य तपळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर (43.4 अंश) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले. याखेरीज अकोला (43.1 अंश) जगातील सातव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. देशात विदर्भ सर्वाधिक उष्ण ठरला असून चंद्रपूर व अकोला या शहरांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांकावर आहे.
विदर्भातील गडचिरोली (39.6) जिल्हा वगळता सगळ्याच जिल्ह्यातील तापमान 40 अंशांहून अधिक होते. यात अकोलाखालोखाल वर्धा येथे 42.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातही 41.5 अंश तापमानाची नोंद झाली. सध्या शहरात तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. शहरात बुधवारीसुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात थोडी फार घसरण होण्याची शक्यता आहे. परंतु, बुलडाणा आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा प्रादेशिक हवमान खात्याने दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यात गुजरात, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ व राज्यस्थान यांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा 38 अंशांवर
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी वळिवाने तडाखा दिला. तरीही रात्री काही काळ सोडता पुन्हा तापमानाचा पारा चढला असून एप्रिल महिन्यातच सातारा जिल्ह्याचे तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे झाले आहे. उन्हाचा तडाखा जोरदारपणे जाणवू लागल्याने जिल्ह्यातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. सकाळी 11 नंतर ते सायंकाळी 5 पर्यंत नागरिक घरातच बसणे पसंद करु लागले आहेत. जिल्ह्यातील कराड, सातारा ही शहरे देखील दुपारी ओस पडू लागली असून रस्त्यावर तुरळक वर्दळ दिसून येत आहे. तापमान वाढीने घराघरात कुलर, पंखे, एसीच्या माध्यमातून उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न नागरिक करत आहेत.
 
तापमान वाढल्याने अशी घ्या काळजी
अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे टाळा, उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळा,
भरपूर पाणी प्या. हलके, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावेत.
उन्हात काम करताना टोपी किंवा छत्रीचा वापर कराला. रुमालाने कान झाकावेत.
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी थंड पेये प्यावीत.