maharashtra

वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा


Both charged in power theft case
वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे 4 लाख 10 हजार 540 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी मुकद्दर सिंकदर बागवान (रा.नेले ता.सातारा) व अकिब (पूर्ण नाव माहित नाही रा. अहमदनगर) यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुणाल नारायण पिंगळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते सहाय्यक अभियंता आहेत.