दहिवडी येथे सुमारे अडीच लाखांची घरफोडी झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : दहिवडी येथे सुमारे अडीच लाखांची घरफोडी झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 डिसेंबर रोजी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने धनाजी नारायण जाधव वय 45 रा. दहिवडी, तालुका माण यांच्या वाईन शॉप च्या पाठीमागील बाजूस असलेल्या भिंतीस अज्ञात चोरट्याने होल पाडून दुकानात प्रवेश करून दुकानातील व स्टोर रूम मधील दोन लाख 47 हजार 940 रुपये रोख रक्कम, विदेशी दारू, सीसीटीव्ही, डीव्हीआर आणि वायफाय राऊटर घरफोडी करून चोरून नेला आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक डी.डी. तुपे अधिक तपास करीत आहेत.


