maharashtra

दुर्गादेवी उत्सवामध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक

दोन देशी बनवतीच्या पिस्तुलासह तीन मॅक्झिनसह दोन जिवंत काडतुसे जप्त

येथील मंगळवार पेठेत दुर्गादेवी उत्सवात हवेत गोळीबार करून दहशत वाजवणाऱ्या चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह तीन मॅक्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सातारा : येथील मंगळवार पेठेत दुर्गादेवी उत्सवात हवेत गोळीबार करून दहशत वाजवणाऱ्या चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह तीन मॅक्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मंगळवार पेठेत मनामती चौक येथे असणाऱ्या सेंट हायस्कूलमध्ये झालेल्या बाचाबाचीवरून चिडून अमीर सलीम शेख, रा. हनुमान मंदिर शेजारी, वनवासवाडी, कृष्णा नगर, सातारा, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे, रा. काळे वस्ती, निकी बंटस हॉटेलच्या पाठीमागे, मोळाचा ओढा सातारा, साहिल विजय सावंत, रा. शाहूपुरी पोलीस ठाण्यात समोर, सातारा या चार जणांनी दोन दुचाकीवरून येऊन हवेत गोळीबार करून दहशत माजवली होती. यावेळी सचिन श्रीपाद घडशी याने त्यांना रोखले असता त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून दमदाटी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्यातील संबंधित चौघे घटना घडल्यापासून फरार होते.
या चौघांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष पथक स्थापन केले होते. दि. १८ ऑक्टोंबर रोजी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित संग्राम विजय जाधव, रा. आदर्श विहार अपार्टमेंट, वनवासवाडी, सातारा याच्या घरी लपुन बसले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ छापा टाकून वरील चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुल, तीन मॅक्झिन व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पवार, विक्रम पिसाळ, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, यशोमती काकडे, ज्योती शिंदे यांनी सहभाग घेतला.