maharashtra

कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा


अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास मोहन परशुराम टापरे राहणार पुणे हे त्यांच्या पत्नीसह पुण्याकडे त्यांच्या वॅगनार कार क्रमांक एमएच 12 एनई 5902 मधून निघाले असताना सातारा गावच्या हद्दीत फर्न हॉटेल समोर किरण मच्छिंद्र फटे राहणार हजापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच 14 जीयु 4161 हा भरधाव वेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून टापरे यांच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.