maharashtra

जिल्ह्यातून तीन बेपत्ता


Three missing from the district
सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२७ मी रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाढे, ता. सातारा येथील पाटखळ रोडवर असणाऱ्या भाड्याच्या घरातून अश्विनी रवी फुलमाळी, वय २५,
रा. वाढे ही महिला कोणास काहीएक न सांगता कुठेतरी निघून गेली असल्याची तक्रार रवी मारुती फुलमाळी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.
दुसऱ्या घटनेत दि.१० मे रोजी ६.३० ते‌ ७ वाजण्याच्या सुमारास मलटण, ता. फलटण येथील ढोर गल्ली येथून सौ. पूजा सतीश घमंडे, वय ३४ ही महिला राहत्या घरातून कोणास काही येत नसतात कुठेतरी निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार पती सतीश राजू घमंडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
तिसऱ्या घटनेत दि.३० रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास खताळवस्ती, दहिवडी, ता. माण येथून पूजा पांडुरंग बंडगर, वय १९ ही होती घरात कोणास काहीच न सांगता निघून गेली असून ती अद्याप परत न आल्याची तक्रार पांडुरंग मारुती बंडगर यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.