maharashtra

कराडमध्ये पिस्तुल व मॅगॅझीनसह युवकास अटक

हॉटेलमध्ये छापा टाकून घेतले ताब्यात : गुन्हे प्रतिबंधक विभागाची कारवाई

Youth arrested with pistol and magazine in Karad
येथील भाजी मंडई परिसरात पोलिसांनी पिस्तल व मॅगॅझीनसह युवकास अटक केली. परिसरातील हॉटेलमध्ये पिस्तुल घेवून बसलेला असताना पोलिसांनी छापा टाकून रेकॉर्डवरील संशयीतास ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे पिस्तुल व मॅगॅझीन जप्त केले आहे.

कराड : येथील भाजी मंडई परिसरात पोलिसांनी पिस्तल व मॅगॅझीनसह युवकास अटक केली. परिसरातील हॉटेलमध्ये पिस्तुल घेवून बसलेला असताना पोलिसांनी छापा टाकून रेकॉर्डवरील संशयीतास ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे पिस्तुल व मॅगॅझीन जप्त केले आहे.
एस.टी. उर्फ सोहेल हारून तांबोळी (वय 22) रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड असे याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांना पिस्तुलधारक युवकाची माहिती मिळाली. संबंधित युवक हा पोलिस रेकॉर्डवरील संशयीत असून त्याची माहिती देत त्यांनी गुन्हे प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार पेठेतील एका हॉटेलमध्ये सापळा रचला.
त्यावेळी संशयीत एसटी उर्फ सोहेल तेथे आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला पिस्तुल लावल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्यानंतर संशयित  कावरा बावरा होऊन पळण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्यांनतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्यांना त्याच्या पन्टच्या उजव्या खिशात दोन रिकाम्या मॅग्झीन सापडल्या. त्यांनतर पोलिसांनी त्याला पिस्टल व मॅग्झीनसह अटक केली. त्याच्याक़डे सापडलेली पिस्तुलची किंमत ४० हजार रुपये असून १ हजारांची २ रिकाम्या लोखंडी मॅग्झीनही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गुन्हे प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, हवालदार नितीन येळवे, संजय जाधव, गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.